धरणगांव बस स्टॉपवर झोडगा येथील विद्यार्थ्यांना बस नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक कार्यालयातच भरविली शाळा
![]() |
आगार व्यवस्थापक कार्यालयात शाळा भरताच झोडगा साठी दोन नविन फेरऱ्या सोडण्याचे आगार व्यवस्थापक दराडे चे आश्वासन |
मलकापुर प्रतिनिधी
मलकापुर:-ग्राम झोडगा येथील ऐंशी ते नव्वद विद्यार्थी विद्यार्थिनी धरणगाव येथील डि.ई.एस हायस्कूल मध्ये शिकत असून मलकापूर येथुन कुऱ्हा काकोडा कडे जाणाऱ्या बसेस धरणगाव येथील बस स्टॉप वर थांबत नसल्याने त्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करून घरी जावे लागत असल्याची बाब शिवसेनेचे पदाधिकारी गजानन ठोसर यांना विद्यार्थ्यांनी सांगितल्याने आज दि. 06 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता त्या विद्यार्थ्यांना घेऊन आगार व्यवस्थापक दराडे यांच्या कार्यालयातच शाळा भरवली व या विद्यार्थ्यांना होणारा त्रास आगार व्यवस्थापनांच्या लक्षात आणुन दिला या विद्यार्थ्यांसाठी सकाळी साडेसहा व शाळा सुटल्यावर सायंकाळी साडेचार वाजता अशा दोन स्वतंत्र बसफेऱ्या सोडण्याची मागणी गजानन ठोसर यांनी केली.विद्यार्थ्यांची संख्या पाहता आगार व्यवस्थापक दादाराव दराडे यांनी सकाळी साडेसहा वाजता व सायंकाळी साडेचार वाजता अशा दोन फेऱ्या नव्याने सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी गजानन ठोसर,किशोर राऊत,पवन गरुड, संजय कातव,निरज येवतकर,दिलीप कंडारकर सह सरपंच समीर नारखेडे,ग्रा.प.सदस्य धिरज नारखेडे, स्नेहा नारखेडे, रोशनी खडसे, प्रज्ञा नारखेडे, प्रांजल वराडे, दीपिका नारखेडे, शितल महाले, श्रुतिका नारखेडे,शितल महाले, वैष्णवी गावंडे, अंकिता अंभोरे,सानिका नारखेडे, गौरी सपकाळ, खुशबु भारंबे, वैष्णवी चव्हाण,आचल मोरे, साक्षी डाबेराव, चैताली चव्हाण,दिक्षा कोंगळे, ऋतुजा कोंगळे, वैष्णवी वराडे, निलाक्षी कोंगळे, साक्षी नारखेडे, साक्षी मोरे, प्रतीक्षा अहिरे, अश्विनी मोरे, दिक्षा अहिरे, जया अहिरे, निलम कोंगळे, वैष्णवी महाले, सृष्टी भोळे,आचल नारखेडे, प्रथमेश भारंबे, ओम भोळे, ओम कंडारकर, कपिल भोळे, कलश वराडे, ओम नारखेडे, ऋषिकेश लांजुळकर ओम वराडे, अंकित रोठे,अनुप गाजरे, प्रणव नारखेडे, गणेश खडसे सह झोडगा येथील असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.