अखेर तीन सरपंचसह उपसरपंच व गावकर्यांच्या प्रयत्नांना यश, उपोषणाची सांगता
मतिन शेख, प्रतिनिधी संग्रामपुर:
संग्रामपुर तालुक्यातिल बावनबिर,पळसोडा,पंचाळा या गावात गेल्या अनेक महिन्यापासुन विजेच्या विविध समस्या निर्माण झाले होते. या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात या मागणीचे निवेदन खामगावचे कार्यकारी अभियंता यांना २४ ऑंगस्ट रोजी देण्यात आले होते. परंतु मागण्या मान्य न झाल्यास कॉग्रेस नेते संजय ढगे, बावनबिर सरपंच गजानन मनसुटे, उमरा-पंचाळा सरपंच अनिल खानझोड पाटील, पळसोळा सरपंच सदाशिव कुचेकार, बावनबिर उपसरपंच शेख नजीर, आकाश काळमेघ व ग्रामस्थांनी ५ सप्टेंबरपासून सोनाळा विज वितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. नादुरुस्त रोहीत्र दुरस्त करणे,लांबलेली तारे ओढणे,तारेखाली वाढलेली झाडे तोडणे, डिपीवर एव्ही स्विच बसवणे, वेळोवेळी खंडित होणारा विज पुरवठा सुरळीत ठेवणे,अशी उपोषणकर्त्यांची मागणी होती. पहिल्या दिवशी सहाय्य अभियंता बोदडे यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली व पत्र दिले.
तरी उपोषणाची सांगता झाली नव्हती. व दुसर्या दिवशी उपकार्यकारी अभियंता नवलकर यांनी सुद्धा उपोषणकर्त्यांना भेट देऊन पत्र दिले. तरीपण उपोषणाची सांगता झाली नाही. व संध्याकाळी खामगावचे कार्यकारी अभियंता यांनी भेट देऊन मांगणी मान्य करण्यात आली व काही कामे तात्काळ करण्यात आली. जसे गावातिल लांबलेली तारे ओढण्यात आली,डिपी दुरस्त करण्यात आली, झाडांच्या फाद्या तोडण्यात आल्या, व नविन डिपीसाठी लागणारे साहित्य गावात टाकण्यात आले, तिन गावात निंबाळकर व इंगळे या दोन कर्मचारीची नेमणुक करण्यात आली. व दिसर्यादिवशी उपकार्यकारी अभियंता नवलकर व सहा अभियंता बोदडे यांचे हस्ते शरबत घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
उपोषणाची सांगताच्या वेळी माजी सरपंच रामसिंह सोळंके, शेख सलाम, कमरोद्दीन मिर्झा, कैलास आकोटकार, कलीम काझी, प्रमोद पडियार व असंख्य ग्रामिण उपस्थित होते.