चीडीमारी विरूद्ध नांदुरा पोलिस ऍक्शन मोडवर,नायगाव येथील ऐका विरूद्ध कारवाई.
नांदुरा
नांदुरा शहरातील शाळा व महाविद्यालया जवळ चिडीमारी करणाऱ्या काहीटवाळखोरांना नांदुरा पोलिसांनी चोप देत नायगाव येथील शुभम ज्ञानदेव डामरे वय २० याचे विरूद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई केली आहे
नांदुरा शहरातील व शहरालगत असणाऱ्या शाळा, काॅलेज गत काही महिन्यांपासून चीडीमारी करणाऱ्या टवाळखोर पोरांचे प्रमुख केंद्र झाले आहे. पालकांचे आपल्या मुलांकडे होणारे दुर्लक्ष, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाने घेतलेली आंधळ्याची भुमिका आणि पोलीस प्रशासनाचे याकडे होणारे दुर्लक्ष याच्या मुळे चिडीमारीचे प्रकार दीवसें दिवस वाढीस लागले आहेत.
शाळा भरण्याचे व सुटण्याचे वेळेस चीडीमारी करणाऱ्ये टवाळखोर शाळेजवळ गर्दी करुन विद्यार्थीनींना त्रास देत असल्याने त्यांच्या त्रासाला त्याही कंटाळल्या आहेत. शाळेच्या आजुबाजूला राहणाऱ्या लोकांनी या टवाळखोरांना हटकल्यास ते यांच्याशी वाद घालुन वेळ प्रसंगी हमरी तुमरीवर येतात. त्यामुळे नांदुरा पोलिसांनी चिडीमारी करणाऱ्या टवाळखोरां विरूद्ध कारवाई करण्याची मागणी होत असल्याने नांदुरा पोलिसांनी आज ऍक्शन मोडवर येत पीएसआय चंद्र कांत मोरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सकाळी अकरा वाजता कोठारी शाळेजवळ येवुन चीडीमारी करणाऱ्या टवाळखोरांना चांगलाच चोप दिला.
चोप दिल्या नंतर मोरे यांनी त्यांना तंबी देऊन सोडुन दिले. पोलिस चोप देत असल्याचे पाहून अनेकांनी तेथुन पळ काढला. यानंतर पीएसआय मोरे हे भारतीय ज्ञानपीठ शाळेजवळ गेले असता तेथेही काही टवाळखोर चीडीमारी करीत असल्याचे दिसून आल्याने तेथेही त्यांनी अनेकांना चोप दिला. यावेळी नायगाव येथील शुभम ज्ञानदेव डामरे वय २० हा मात्र शाळेसमोर असभ्य वर्तन करतांना मीळुन आल्याने पोलीसांनी त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याचे विरुद्ध ईस्तेगाशा नं . १४/ २२ कलम ११०, ११७ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये कारवाई केली आहे. दरम्यान उशिरा का होईना परंतु नांदुरा पोलिस ऍक्शन मोडवर आल्याने चिडीमारांचे धाबे दणाणले आहे. नांदुरा पोलिसांनी यापुढे चिडीमारी करणाऱ्या टवाळखोरां विरूद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.