त्या 'मॅडमचा अखेर विजय! सत्याला न्याय मिळतो याचीच परीक्षा : मनीषा लागे
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
चिखली:- चिखली तहसील अंतर्गत रोजगार हमी विभागात डाटा ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा लागे यांच्या विरोधात गेल्या वर्षभरापूर्वी अप.नं. 389/2021 कलम 306 भादविप्रमाणे गुन्हा दाखल संगीता रामेश्वर ढोरे वय 32 यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला स्वतः हजर राहून माझ्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या तहसीलच्या रोजगार हमी डाटा ऑपरेटर विभागात कार्यरत असणाऱ्या मनीषा लागे यांच्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केली असा आरोप लावून त्यांच्यावर 1ऑगस्ट 2021 रोजी अप.नं.379/2021कलम 306 नुसार अन्वये अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात दाद मागितली व न्यायालयाने सदर प्रकरणात दोषारोपपत्र तपासणी केले असता गेल्या वर्षभरात मनीषा लागे यांच्या बाजूने निकाल लागला सदर रोजगार सेवक श्री रामेश्वर ढोरे यांच्या मरणास किंवा आत्महत्येस मनीषा लागे यांचा कुठलाही संबंध नसल्याचे प्रथमदर्शनी पुरावे तपासून विद्यमान न्यायालयाने मनिषा लागे यांना निर्दोष मुक्तता केली आहे तरी त्यांच्या निर्दोष मुक्ततेमुळे कर्मचारी वर्गातून सुट्केचा श्वास सोडण्यात येत आहे एखाद्या कर्मचाऱ्यावर होत असलेला हा अन्याय थांबला आणि अखेर कर्मचारी संघटनेचा किंवा एकजुटीचा विजय झाल्याचे सर्व कर्मचारी वर्गात बोलले जात आहे .
मनिषा लागे यांच्या म्हणण्यानुसार माझे रोजगार सेवक रामेश्वर ढोरे यांच्यासोबत कार्यालयीन कामाव्यतिरिक्त कुठलेही वाद किंवा आपसी हेवेदावे नसून मला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आलं या प्रकरणामुळे माझी माझ्या घरच्यांची माझ्या आईची यांची मानसिक स्थिती व आर्थिक स्थिती खूप खालावली असून परिस्थितीने आम्ही खूप खचलो होतो परंतु न्यायालयाच्या या निकालाने आम्हाला आमचा मानसन्मान परत मिळवून दिल्याबद्दल मी कर्मचारी संघाचे सर्व मित्र कर्मचाऱ्यांचे आभारी असून सत्याचा शेवटी विजय झाला ! असेच म्हणावे लागेल असे मत त्यांनी दैनिक अहिल्या राजच्या