संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविणार-स्वप्नील पाटील तळणीकर
नांदेड प्रतिनिधी -
संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष आमचे प्रेरणास्थान प्रवीणदादा गायकवाड यांचा वाढदिवस दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रभर विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्यात येतो. नांदेड शहरातील मराठवाडा लोकसेवा मंडळ संचलित नेरली कुष्ठधाम येथे येथे फळ वाटपाचा कार्यक्रम असून तसेच तालुक्यातील जिल्हापरिषद शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे हे उपस्थित राहणार असून शहरातील संभाजी ब्रिगडचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तसेच जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष यांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात यावा अशी माहिती संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव, जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील तळणीकर, योगेश शिंदे,राहुल धुमाळ, यांनी प्रसिध्दी माध्यमातून माहिती दिली आहे..!!