काटी येथे किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न
श्रीकांत हिवाळ नांदुरा प्रतिनिधी
नांदुरा तालुक्यातील ग्राम काटी येथे दि. २८ सप्टेंबर२०२२ रोजी सकाळी ९ वाजता य्कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन 2022-23 अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील शास्त्रज्ञ श्री संजय उमाळे साहेब व अनिल गाभने साहेब यांनी कापूस, मका,तुर सोयाबीन पिकावरील किड व रोग नियंत्रण , फेरोमन ट्रप ,गुलाबी बोंड अळी, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी , सेंद्रिय शेती या विषयावर मार्ग दर्शन केले.
तसेच करडई, जवस, मोहरी व सूर्यफुल या रब्बी पीक बाबत श्री तिजारे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी मार्गदर्शन केले. Pmfme योजने बाबत पराग गवई यांनी मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभागाच्या विविध योजने विषयी श्री वनारे कृषी सहाय्यक यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी कृषी सहाय्यक आढाव यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाला गावांतील सरपंच श्री शरद हिवाळे शेतकरी गटातील सदस्य प्रगतशील शेतकरी श्री रविंद्र हिवाळे, नीवृत्ती रोकडे, विठ्ठल जंगले, मधुकर रोकडे, भिमराव हिवाळ,अनिल बोराळे, गजानन रोकडे, अशोक हिवाळे, काशिराम हिवाळे यासह गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात होते. कृषी पर्यवेक्षक वानखडे,कृषि सहाय्यक पी. व्ही. वणारे, कृषी सहाय्यक आढाव, कृषी सहाय्यक बागुल व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक मनोज तिजारे उपस्थित होते.