गोडे कॉलेज येथे ऑरिजनल डॉक्यूमेंट माग्ण्याकरिता वारंवार चक्करा मारल्या शेवटी कंटाळून विद्यार्थ्यांच्या भावाने स्वताच्या आगावर पेट्रोल टाकून घेतले पेटवून
बुलडाणा प्रतिनिधी
बुलडाणा शहरातील गाडे कॉलेज ऑफ एग्रीकल्चर कॉलेज येथील विद्यार्थ्यांच्या भावाने ऑरिजनल डॉक्यूमेंट मागण्याकरिता गेले असता कॉलेज मध्ये स्वताच्या अगावर पेट्रोल टाकून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या जिल्हासामान्य रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज दि २७ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० ते ३:०० वाजेच्या सुमारास तुलसी नगर सागवन परिसरातील गोडे कॉलेज ऑफ अॅग्रीकलचर येथे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
जीवन गंगाधर मुफडे (२८) रा.नांदेड ह.मु.बुलडाणा घटनेत स्वता:ला पेटवून घेणाऱ्या तरूणाचे नाव आहे. विशाल विष्णू मिसाळ (२५)रा.जालना ह. मु.बुलडाणा हा गोडे कॉलेजमध्ये शिकणार विद्यार्थी आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झाले असे की, विशाल हा गोडे कॉलेज मध्ये बीएसी अॅग्री साठी शिकत होता.२०२१ मध्ये त्यांची बी.एस.सी.अॅग्री पदवी पुर्ण झाली होती. आज विशाल आणि त्यांचा भाऊ जीवन हे कॉलेज मध्ये ऑरिजनल डॉक्यूमेंट घेण्याकरिता गेले होते. शेवटच्या वर्षी कॉलरशिफ आली नाही . सरकारकडून ५० हजार स्कॉलरशिप येते पंरतू या वेळेस आली नाही.समोर एम.बीए. साठी अॅडमिशन घेणे होते. त्या करिता मी आणि माझा भाऊ कॉलेजला गेलो. तिने ते चार वेळा गेलो. अॅपलिकेशन सुध्दा दिली मला पुढे अॅडमिशन घेणे आहे मला माझे ऑरिजनल डॉक्यूमेंट द्या. हातपाय जोडले शेवटी त्यांनी संस्थाचालक यांना भेटा तुम्ही त्यांना भेटले तरी सुध्दा माझे डॉक्यूमेंट मला भेटले नाही आज परत गेलो त्यांना डॉक्यूमेंट मागितले. राहिलेली कॉलेजची फि थोडी थोडी करुन देऊन टाकतो असे बोलो परंतु शेवटी कंटाळून आमच्याकडे शेवटचा प्रयत्न उरला आणि कॉलेजचे प्रिसीपल समोर माझ्या भावाने पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. असे प्रसारमाध्यमाशी बोलातांना विद्यार्थी यांनी सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच सागवनचे उपसरपंच देवानंद दांडगे हे घटनास्थळी आले लवकरात लवकर अॅम्ब्यूलन्स बोलवून जखमी तरूणाला जिल्हासामान्य रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळण्यात यावा अशी मागणी जखमीच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.पुढील कारवाई पोलीस करत आहे. वृत्तलिहेर्यंत अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता.