Breaking News
recent

माहीती अधिकार दिनानिमित्त नांदुरा पोलिसांची जनजागृती मोहीम



शहर प्रतिनिधी

नांदुरा.  माहीती अधिकाराबाबत सर्व सामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने ठाणेदार भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुक्यातील विविध गावांतील शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात  नांदुरा पोलिसांनी  २८ सप्टेंबर रोजी कार्यक्रम घेवून जनजागृती मोहीम राबवली. 

 २८ सप्टेंबर हा दिवस देशात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केल्या जातो. या दिनानिमित्त माहिती अधिकार अधिनियम सन २००५ कलम २६(१)(क)(ख) अन्वये  माहिती अधिकार अधिनियमा बाबत सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पीएसआय चंद्र कांत मोरे यांनी दहीगाव, माटोडा, वडी , सोनज व खुमगाव येथील शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम घेवून माहीती अधिकाराबाबत ऊपस्थीतांना मार्गदर्शन केले माहिती अधिकार कायदा अमलात आल्यानंतर याचा अनेक जण स्वतः च्या आर्थिक हीतासाठी वापर करतात . मात्र असे न करता या अधिकाराचा वापर समाज हीत व विकासात्मक कामांसाठी करावा. असे आवाहन करीत  पीएसआय मोरे यांनी  माहिती अधिकारा बाबत सर्वांना माहीती व्हावी या हेतूने प्रत्येक ठिकाणी  माहीती अधिकार कायद्याची पुस्तके भेट देऊन स्तुत्य उपक्रम राबवीला . तसेच माळेगांव गोंड, वडाळी, धानोरा बु. व धानोरा खु.येथे संदीप डाबेराव, संजय जाधव व विष्णू गीते यांनी तर अलमपुर येथे प्रभाकर देवचे, निमगाव येथे श्याम आघाव, गजानन इंगळे , चांदुर बिस्वा येथे श्याम कपले तर वडनेर भोलजी येथे संजय निंबोळकर या पोलिस कर्मचाऱ्यांनी  कार्यक्रम घेवून जनजागृती मोहीम राबवली.

Powered by Blogger.