Breaking News
recent

शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी निपाणा सरपंच सौ. शारदा संतोष तांदुळकर व ग्रा.पं.सदस्या छाया विनोद तायडे यांचे सदस्यत्व अपात्र

 


अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी अपात्रतेबाबत दिले आदेश

मलकापूर प्रतिनिधी

 निपाणा ग्राम पंचायत सरपंच सौ. शारदा संतोष तांदुळकर व सदस्या छाया विनोद तायडे यांना धनंजय गोगटे अप्पर जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी करण्यात आलेल्या एका तक्रारीच्या प्रकरणामध्ये दोघांनाही पुढील कालावधी करीता अपात्र करण्याचे आदेश २७ सप्टेंबर रोजी पारीत केले आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी की, मोताळा तालुक्यातील निपाणा येथील सरपंच सौ. शारदा संतोष तांदुळकर व त्यांचे पती संतोष सिताराम तांदुळकर यांचेसह एकत्र कुटुंबात राहत असून त्यांचे पती संतोष तांदुळकर यांनी निपाणाग्राम पंचायतच्या हद्दीतील निपाणा- देवी मार्गावरील शासकीय रस्त्यावर अतिक्रमण यांनी करून त्यावर पक्के घराचे बेकायदेशीररित्या काम केले व सदर अतिक्रमीत मालमत्तेचा जुना क्र. २३५ असा असून त्यांनी अतिक्रमण केल्याबाबतची सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती प्रकरण दाखल करण्यात आलेले होते. 

  त्यांच्या विरूध्द निपाणा येथील नितीराजसिंह रामसिंह राजपूत यांनी त्यांना याप्रकरणी अपात्र ठरविण्याचे प्रकरण २०२१-२२ मध्ये दाखल केले होते. तसेच ग्राम पंचायत सदस्या छाया विनोद तायडे यात्यांचे पारित केले आहे. पती विनोद तायडे यांचेसह एकत्र कुटुंबात राहत असून त्यांचे कुटुंबियांनी सुध्दा शासकीय मालमत्ता क्र.४०५ वर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले आहे. ग्रामपंचायतच्या नमुना ८ ला मालकाचे नाव म्हणून शासन असा उल्लेख आहे.

   तसेच छाया तायडे यांचेकडे शौचालय सुध्दा नाही. छाया तायडे व त्यांचे कुटुंबियांनी शाससकीय जागेवर अतिक्रमण केले. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात यावे अशी दुसरी तक्रार नितीराजसिंह रामसिंह राजपूत अप्पर जिल्हाधिकारी बुलडाणा धनंजय गोगटे यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. या दोन्ही प्रकरणात २७ सप्टेंबर रोजी आदेश पारीत करण्यात आले असून सरपंच सौ. शारदा तांदुळकर बया.पं.सदस्य छायातायडे यांचे सदस्यत्व महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमनाचे कलमानुसार तरतुदींचा भंग केला असल्यामुळे त्यांना पुढील कालावधीकरीता सदस्य पदावरुन अपात्र करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने पारित केले आहे

Powered by Blogger.