Breaking News
recent

विजेचा शॉक लागल्याने शेतकरी जखमी


प्रमोद हिवराळे प्रतिनिधी

मलकापूर तालुक्यातील वडोदा येथील शेतकऱ्यास शॉक लागून भाजल्या गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की ( सागर राजाराम सुलताने वय 28 रा. वडोदा) असे शॉक लागून भाजल्या गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दररोज प्रमाणे सागर सुलताने हे काम करण्यासाठी शेतात गेले होते. शेतात वखर करत असताना त्यांना शॉक लागला. शेजारच्या शेतात शेतकरी काम करत असतांना त्यांना सागर याला शॉक लागल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित त्यांना खासगी वाहनाने उपचारासाठी मलकापूर येथील रुग्णालयात आणले. विज तारामधील पोल याचे अंतर 200 फुट असे असते. मात्र या पोल मधील अंतर 400 फूट असल्यामुळे तारा खाली लोंबकलेल्या आहेत. त्यामुळे ही घटना घडली असल्याचे बोलतांना सांगितले. ज्या कोणी संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. जे कोणी दोषी ठरतील त्यांवर कारवाई करू असे आश्वासन आमदार राजेश एकडे यांनी दिले आहे.

Powered by Blogger.