महिला आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे डॉ इरवाडकरांचे यवत पंचक्रोशीतील महिला भगिनींना आवाहन
विजय कदम प्रतिनिधी दौंड
दौंड - महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवरात्र उत्सव २०२२ महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे यवत ग्रामीण रुग्णालयत रुग्ण कल्याण समिती सदस्य व मा.उपसरपंच विद्यमान यवत ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे यांच्या हस्ते फित कापून सुरूवात करण्यात आली.
यावेळी बोलताना रुग्णालयाचे प्रमुख डॉ. इरवाडकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती यावेळी उपस्थित महिला भगिनींना दिली. यवत पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनी यांची मोफत संपुर्ण आरोग्य तपासणी या शिबिरामध्ये करण्यात येणार असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मुख्य शिबिराची तारीख घोषित करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक लहान मोठ्या आजारावरती तपासण्या व लहान मोठ्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. तरी यवत व परिसरातील सर्व महिला भगिनींनी ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन यवत ग्रामीण रुग्णालय प्रमुख डॉ. इरवाडकर यांच्याकडून करण्यात आली आहे. यावेळी डाॅ.गरड, खराडे सिस्टर ,भानुसे सिस्टर, बागवान मॅडम आढाव मॅडम ,वरवंडकर मॅडम, पवार मावशी, यवत विकास सोसायटीचे मा. चेअरमन विद्यमान संचालक आण्णा दोरगे,तावरे, राहुल घेवरे, शहाणे, स्वामी, जावळे व मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या.