शासकीय माती आणि पाणी परीक्षण केंद्र उभारावे सुप्रियाताई सुळे यांच्याकडे मागणी
विजय कदम प्रतिनिधी दौंड
दौंड- बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल दोरगे यांनी दौंड तालुक्यामध्ये शासकीय माती आणि परीक्षण केंद्र उभारावे अशी मागणी केली आहे दौंड तालुक्यामधील शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस घटत चालल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. दौंड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतील मातीचे परीक्षण करण्यासाठी कुठलीही शासकीय सुविधा उपलब्ध नाही.
ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना पुण्यामध्ये जाऊन माती परीक्षण करावे लागतील ही बाब खूप खर्चिक आहे मातीचे परीक्षण केल्यानंतर शेतकरी शेतकरी आपल्या पिकांमध्ये व शेतीमध्ये अमुलाग्र बदल करू शकतात परंतु दौंड तालुक्यात ही सोय उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी माती परीक्षण करू शकत नाही त्यामुळे आपण शासनाकडे पाठपुरावा करून जाऊन दौंड मध्ये शासकीय माती परीक्षण केंद्र सुरू तर त्याचा फायदा दौंड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये निश्चित निश्चित भर पडेल तरी आपण या कामी सरकार सरकारकडे पाठपुरावा करून हे केंद्र दौंड तालुक्यामध्ये उपलब्ध करून द्यावे.
अशी मागणी दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली यावेळी वि मजठ्ठल दोरगे अध्यक्ष कमिटी सोमनाथ सोडल्यावर उपाध्यक्ष दौं तालुका काँग्रेस कमिटी नागेश फडके सरचिटणीस दौंड तालुका काँग्रेस कमिटी व अनेक पदाधिकारी उपस्थित होते