शिवसेनेच्या वतीने रस्त्याच्या समस्यासाठी निवेदन दोन दिवसात समस्या मिटवा अन्यथा रस्ता रोको
नांदुरा/प्रतिनिधी
नांदुरा शहरातुन गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर डॉ.मोहता हॉस्पिटल पासून ते भारतीय स्टेट बॅंक पर्यंत अतिशय मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्या मध्ये संबंधित यंत्रणेने खड्या मध्ये मातीमिश्रित दगड मातीचे मिश्रण टाकून बुजवले पण या मुळे पाऊस पडला की तिथे चिखल होतो आणि ऊन पडले की धूळ उडते आणि धुळीचे प्रमाणे खूप भयावह असल्यामुळे दुकानदार याच्या आरोग्याला व त्या रस्त्याने येणे जाणे करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धुळीचा धोका असल्याने व ही धूळ आजू बाजूच्या दूरवर च्या परिसरात जात आहे
म्हणून या रस्त्या वर लवकरात लवकर डांबरीकरणं करून नांदुरा शहरातील ही समस्या दोन दिवसात मार्गी लावावी यासाठी आज नांदुरा तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन मागणी केली अन्यथा शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात रस्ता रोको केला जाईल असा इशारा शिवसेने च्या वतीने देण्यात आला यावेळी निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख ईश्वर पांडव शहर प्रामुख लालाभाऊ इंगळे युवासेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र वसंतराव भोजने व दुकानदार व्यापारी वर्गातील, नवगजेजी, नीरज मोहनांनी, राठीजी, प्रवीण भुतडा, शेख कलिम, शर्माजी, पूजा कलेक्शन मालकचे मोठा प्रमाणात दुकानदार, व्यापारीवर्ग उपस्थित होते.