एक्का बादशाहा नावाच्या जुगारावर पोलिसांचा छापा १९ जणांवर गुन्हे दाखल
![]() |
विश्वी येथील घटना ४५,८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त |
प्रमोद हिवराळे जिल्हा प्रतिनिधी
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम विश्वी येथे डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश असपुंदे यांना गुप्त माहितीच्या आधारे विश्वी येथे चालू जुगार अड्ड्यावर छापा मारून या छाप्यामध्ये १९ आरोपीसह हजार ८७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशाप्रकारे आहे नमुद घटनेची माहिती मिळताच ठाणेदार निलेश असपुंदे पोलीस स्टाफसह मिळालेल्या गुप्त मिळताच्या आधारे विश्वी येथे छापा मारला आहे नमुद घटनेची माहिती मिळताच ठाणेदार निलेश असपुंदे पोलीस स्टाफसह मिळालेल्या गुप्त मिळताच्या आधारे विश्वी येथे छापा मारला.
दरम्यान यातील आरोपी गणेश संपत त्रिकाळ वय ४३ वर्ष, मधुकर - पांडू राठोड वय ६२ वर्ष, देवराव चंदु आडे वय ५० वर्ष, शेख रियाज शेख गुलाब वय ३३ वर्ष, प्रकाश रामचंद्र राठोड वय ५० वर्ष, हिरासिंग चंदु . जाधव वय ५७ वर्ष, परशराम झामा,आडे वय ६२ वर्ष, मदन सावजी चव्हाण वय ६७ वर्ष, प्रदिप उर्फ संतोष वसंता खोडके वय ४० वर्ष, विठ्ठल नरसिंग राठोड वय ४७ वर्ष, गणेश किसन जाधव वय २९ वर्ष, मनोहर भिकाजी सोनवणे वय ६५ वर्ष, ज्ञानदेव झनक अवसरमोल वय ३८ वर्ष, हिरा मेहराम राठोड वय ५८ वर्ष, सुरेश कुंडलीक पिसे, प्रेमदास मंगा जाधव वय ५५ वर्ष, जनधन शंकर शेवाळे वय ७३ वर्ष,नथु मेरचंद्र राठोड वय ७० वर्ष, सदर आरोपी म्हणून गणेश चंदु राठोड हा एक (फरार) असून सर्व आरोपी विश्व येथील आहेत सदर आरोपी पंचासमक्ष जुगार रेड केला असता नमुद आरोपी हे ५२ ताशपत्यावर वेगवेगळे गोलाकार स्थितीमध्ये बसून एक्का बादशाह नावाचा जुगार खेळ खेळतांना मिळून आल्याने त्यांचेवर जुगार रेड करण्यात आली.
आरोपी यांचे अंगझडतीमध्ये ३५६०/- रुपये व १४ मोबाइल अं.कि.३७२००/-रूपये, डावावर नगदी ४७६०/- रुपये, ५२ ताश पत्याचे ४ कट अं. कि. प्रत्येकी ५०/ रु. प्रमाणे २००/- रुपयेचे ताशपत्ते, एक स्टीलची कळशी किमंती ५०/ रुपये, एक ताडपत्री कि. १००/ असा एकुण नगदी, मोबाइल ताशपत्ते व इतर साहित्यासह ४५८७०/- रु. चा जुगार माल मिळुन आला अशा लेखी रिपोर्ट वरुन अप सदरचा गुन्हा दाखल करून तपास ठाणेदार मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीट पोहेकाँ दिलीप राठोड करीत आहेत.