नॅशनल हायवे क्रमांक सहा च्या ठेकेदाराची मनमानी; उड्डाणपूला शेजारील सर्व्हिस रोडवरील दुकानदारांचा आमरण उपोषणाचा इशारा
मलकापुर:- शहराबाहेरील नॅशनल हायवे क्रमांक सहावर अमरावती ढाब्यानजीक उड्डाणपूलाचे कार्य कल्याण टोल प्राधीकरणाचे सुरू असुन या उड्डाणपूल च्या दुतर्फा सर्व्हिस रोड असुन या सर्व्हिस रोड मध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे, सर्व्हिस रोडवर असलेल्या दुकानात वाहने ये-जा करण्यासाठी तारेवरची मोठी कसरत करावी लागत असल्याने ग्राहक या रोडवरील दुकानात फिरकत नसल्याने त्या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे वेळोवेळी तोंडी सुचना देऊनही ठेकेदार जुमानत नसल्याने आज दुकानदारांनी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना निवेदन सादर केले असुन संबंधित ठेकेदाराने दोन दिवसांत या रस्त्यावर मुरुम न टाकल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनावर सै.सोहेल,अमर पिंजरकर,सै.आसीफोद्दीन, अब्दुल अजीज,सै.अन्सार,शे.नसीर,शे.सलीम,नदीमखान सह आदींच्या सह्या नमूद आहे.