चिखली ग्रामिण रुग्णालय मध्ये गर्भवती महिलांना सिजर करण्यासाठी सुविधा करा :- भाई विजयकांत गवई
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
चिखली ग्रामीण रुग्णालय मध्ये गर्भवती महिलांची सिजर करण्यासाठी कोणत्याच प्रकारची सुविधा नाही चिखली ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व डॉक्टरांनी पेशंटला तपासणी केली की डॉक्टर पेशंटच्या नातेवाईकांना म्हणतात की दवाखान्यात सिजर करण्यासाठी कोणतेच प्रकारचे साहित्य नाही व पेशंटची हालत खूप खराब आणि रक्तही कमी आहे त्यांना ताबडतोब बुलढाणा येथे पाठवलं पाहिजे गर्भवती महिलांना चिखली ग्रामीण रुग्णालया मधून बुलढाणा जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात येते आणि पेशंट व पेशंटचे नातेवाईक बुलढाणा न जाता चिखलीमध्येच खाजगी हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांचा सिजर करून घेतात सिजर करण्यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये 30 या 40 हजार रुपये या गोरगरिबांना त्या ठिकाणी द्यावा लागते गोर गरिबांचे ग्रामीण रुग्णालय असतानाही पेशंटचे हाल होत असतात व सरकारी दवाखान्यांमध्ये कोणत्याच प्रकारचे सुविधा गर्भवती महिलांना मिळत नाही व गर्भवती महिलांना सिजर करण्यासाठी चिखली ग्रामीण रुग्णालयामध्ये ब्लड बँक चे आवश्यकता आहे .
ते सुविधाही ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात यावे चिखली ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांचे व डॉक्टरांचे रुग्णालयामध्ये दुर्लक्ष दिसत आहे ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी यांनी ताबडतोब गर्भवती महिलांसाठी सिजर करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सुविधा करण्यात यावे व गोरगरिबांची लुट खाजगी हॉस्पिटल पासून गोरगरिबांना न्याय देण्यात यावा निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, युवा जिल्हाध्यक्ष लखन कुसळकर, चिखली तालुका अध्यक्ष श्याम लहाने, ऋषिकेश हिवाळे, सतीश इंगळे, अरुण जाधव, पिराजीभाऊ अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या स्टाईलने आंदोलन करू रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.