Breaking News
recent

पोषण महाअभियानामध्ये सुदृढ बालक म्हणून तक्षक दांडगे ची निवड



मलकापूर 25/9/22 प्रत्येक महिलांनी पोषक आहार घेऊन आपलं बाळ सुदृढ होईल याकडे लक्ष दिले पाहिजे तर डाळ पालेभाजी याचे जास्तीत जास्त सेवन करून प्रत्येक बाळ हे सुदृढ असायला पाहिजे असे  बालविकास प्रकल्प बुलडाणा अंतर्गत मलकापूर येथील त्रिरत्न बुद्ध विहार भीमनगर येथे घेण्यात आलेल्या  पोषण महाअभियान या कार्यक्रमांमध्ये  पर्यवेक्षिका म्हणून लाभलेले पाचपोळ मॅडम यांनी बोलताना व्यक्त केले आहे. यावेळी केंद्र क्रमांक 29 अंगणवाडी सेविका राजकन्या वानखेडे यांनी घेण्यात आलेल्या सुदृढ बालकांमध्ये 0 ते 2 वर्षाच्या वयोगटांमध्ये तक्षक सतीश दांडगे या बालकाने प्रथम क्रमांक पाठविला तर 2 ते 3 वर्षाच्या वयोगटांमध्ये आर्यन चंद्रकांत इंगळे चा क्रमांक आला आहे.

 या आयोजित करण्यात आलेल्या पोषण महाअभियान  कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सोनोने मॅडम , नागपुरे मॅडम , देविका राजे , पर्यवेक्षिका पाचपोळ मॅडम यांची उपस्थिती होती.

 यावेळी आहार प्रात्यक्षिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये माधुर खांदे यांनी पोषण मटका बनवून कार्यक्रमाची शोभा वाढविली पोषण आहारावर डिश तयार करून त्यामध्ये दिपाली पाटील , सुवर्णा शेट्टे , रजनी कुळकर्णी यांनी क्रमांक पटकावला तर शुभांगी देशपांडे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी बालकांचे एक हजार दिवस कसे महत्वाचे यावर माहिती विषद केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता ढाकणे यांनी तर आभार प्रदर्शन राजकन्या वानखेडे यांनी केले. यशस्वीतेसाठी माधुरी खांदे , शुभांगी देशपांडे , शारदा इंगळे , अनिता इंगळे यांनी परिश्रम घेतले आहे.

Powered by Blogger.