Breaking News
recent

चोरीच्या गुन्ह्यात पाच वर्ष व सासवड बलात्काराच्या गुन्ह्यातील सुमारे तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद



विजय कदम प्रतिनिधी दौंड

  दौंड चोरीच्या गुन्ह्यात पाच वर्ष व सासवड बलात्काराच्या गुन्ह्यातील सुमारे तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी  जेरबंद. यवत गुन्हे पथकाची कामगिरी.   दौंड ता, २९/०९/२०२२ रोजी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने देऊळगाव गाडा ता. दौंड येथील चोरीतील सुमारे पाच वर्षांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील आरोपी अखेर जेरबंद केला असल्याची  माहिती यवत पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.

      दिनांक ०२/१०/२०१७ रोजी  सकाळी १०.०० वा चे सुमारास फिर्यादी  गणेश साधू करे वय २१ रा. देऊळगाव गाडा ता.दौंड जि. पुणे यांनी तक्रार दिली होती, की  देऊळगाव गाडा गावच्या हद्दीत फिर्यादी यांच्या घरातील डब्यातील रोख रक्कम ४५०००/-हजार रुपये  चोरून नेले बाबत दिनांक ३/१०/२०१७ रोजी यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता .सदरचा गुन्हा घडल्या पासून गुन्ह्यातील निष्पन्न व पाहिजे असलेला आरोपी  सतिश हिरामण शिंदे वय २६ रा.वढाणे भैरवनाथ मंदिरा जवळ ता.बारामती जि. पुणे हा गुन्हा घडल्या पासून फरार झाला  होता. दिनांक २९/०९/२०२२ रोजी सदरचा आरोपी हा वढाणे गावात येणार असल्याची खात्रीशीर बातमी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला मिळाल्याने सदर पोलीस पथकाने वेषांतर करून वढाणे ता. बारामती जि. पुणे येथे गेले असता आरोपी सतिश शिंदे हा पोलिसांची चाहूल लागताच  समोरील डोंगरात पळून जाऊ लागला तेव्हा पोलीस पथकाने त्याचा दोन किलो मीटर पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले असून सदरचा आरोपी सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं.१२१/२०१९ भा. द.वि.कलम ३७६,पोस्को ४ मध्ये सुद्धा फरार आहे.

      सदरची कामगीरी पाेलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक  मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड . राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव, गणेश कुतवळ, पोलीस हवालदार सचिन गायकवाड, सायबर पोलीस स्टेशन यांचे पथकाने केली आहे.



Powered by Blogger.