रयत क्रांती पक्ष व केमिस्ट संघटनेच्या वतीने निशुल्क योग,प्राणायाम,ध्यान,शिबीरचे आयोजन- निशुल्क योग शिबिराचा लाभ घ्या-प्रशांत ढोरे पाटील
चिखली - मनोज जाधव
रयत क्रांती पक्ष व चिखली केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने चिखली केमिस्ट भवन येथे दि. ३ ते ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते ७ यावेळेस पाच दिवशीय निशुल्क योग,प्राणायाम, ध्यान शिबिराचे आयोजन केलेले आहे, शिबिराची वैशिष्ट्ये म्हणजे वजन कमी करणे, रोग प्रतिकार शक्ती वाढविणे, शारीरिक-मानसिक कार्यक्षमता व लवचिकता वाढवणे, ऍसिडिटी ,वातरोग, सांधेदुखी, गुडघेदुखी डोकेदुखी, चिडचिडपणा,ब्लडप्रेशर , डायबेटीज,महिलांचे आजार व अशा इतर आजारावर उपाय तसेच सात्विक आहार मार्गदर्शन केल्या जाणार आहे तरी या शिबिराचा आपण,आपल्या कुटुंबासह व मित्रपरिवाराने लाभ घ्यावा,शिबिरास येताना आसन पट्टी,किंवा सतरंजी सोबत आणावी,पाणी बॉटल शिबिराची वेळ ही सकाळी सकाळी ६ ते ७ असेल शिबिराचे ठिकाणी हे चिखली केमिस्ट भवन पारधी बाबा रोड ,चिखली,जि-बुलडाणा येथे असेल सदर शिबिरात नाव नोंदणी साठी योग शिक्षक म्हणून निलेश शिंगणे (योग शिक्षक)(वाय. टी. टी. सि, डी .वाय. एन .टीचर एम .ए. योगशास्त्र)८२७५३३१९८७,योग शिक्षिका निशा शेळके(Diploma of in yoga teacher)८३९०८७७९३१ हे राहणार असून जास्तीजास्त लाभार्थ्यांना सदर शिबिरात सहभाग नोंदवावा असे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते तथा बुलढाणा जिल्हा केमिस्ट संघटनेचे जिल्हा सहसचिव प्रशांत ढोरे पाटील,जिल्हा सदस्य विनोद नागवाणी,शहराध्यक्ष स्वप्नील तायडे,जिल्हा प्रतिनिधी जयंत शर्मा,सुनिल पारसस्कर,शहर उपाध्यक्ष बद्री पानगोळे,सुचित भराड,गजानन भुते, शरद चिंचोले,विनोद लद्धड,सचिन जगताप,राजेश लद्धड,भारत खंडागळे,दीपक मेरत,दिनेश घुबे,स्नेहल वानखेडे,रयतचे ता.अध्यक्ष सचिन काकडे,शहराध्यक्ष सचिन पडघान,संजय कुटे,रवींद्र पवार,शिवाजी पवार,यशपाल लहाने,दीपक पुनगळे,गंगाधर भुतेकर, कैलास घाडगे,रवी तळेकर,गणेश जाधव,मनोज काटिकर,आदींनी सदर निशुल्क योग शिबिराचे आयोजन केले आहे.