रोजगार सेवक संघटनेचे ३ आक्टोंबर रोजी लाक्षणिक उपोषण
मतिन शेख, प्रतिनिधी संग्रामपुर
संग्रामपूर तालुक्यातील रोजगार सेवक आपल्या विविध मागण्यासाठी ३ आक्टोबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा एका निवेदना द्वारे दिला आहे . गटविकास अधिकारी संग्रामपूर यांना आज दि ३० सप्टे रोजी दिलेल्या निवेदनात संघटनेने विविध मागण्या केल्या आहेत . ८ मार्च २०११ चा अर्ध वेळ शासन निर्णय पूर्ण वेळ करून रोजगार सेवकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे . रोजगार सेवकांना निश्चित मानधन देऊन ते त्यांच्या वयक्तीक खात्यात जमा करण्यात यावे .
वयोवृद्ध रोजगार सेवकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला पदावर घेण्यात यावे . रोजगार सेवकांना विमा कवच लागु करण्यात यावे . मजुरांची ऑनलाइन हजेरी घेण्यासाठी रिचार्ज सह मोबाईल देण्यात यावा ' आदि मागण्या करिता गटविकास अधिकारी यांच्या कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व काम बंद आंदोलन करण्यात येईल असे निवेदनातुन म्हटले आहे .निवेदनावर संघटनचे राहूल मेटागे , वासुदेव गवई , देविदास शिंदे, गजानन बामने , संतोष वानखडे, अर्जुन ढगे ,सुरेश कुरवाडे,भानुदास रावनकार , विनोद पुरकर, सलभामा चोपडे, आदी सह संघटनेच्या पदाअधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .