पान्हेरा येथील 24 वर्षीय युवती बेपत्ता
मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर तालुक्यातील पान्हेरा येथील 24 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. पान्हेरा येथील रुपाली आकाश तायडे ही 24 वर्षीय युवती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती 8 ऑक्टोबर रोजी देण्यात आली आहे..