Breaking News
recent

जि. प. शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा



 देवणी प्रतिनिधी

गोरसेना देवणी तालुक्याच्या वतीने ० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासननिर्णयाविरोधात तहसील कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय देवणी येथे निवेदने देण्यात आली.वाडी वस्ती तांड्यातील शाळा 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनाच्या हुकुमी निर्णय तात्काळ वापस घ्यावेत या मागणी साठी आज गोरसिकवाडी गोरसेनेच्या वतीने गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रा.संपत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील २४१ ठिकाणच्या तहसील कार्यालय, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बिडिओ,कलेक्टर यांना निवेदन देण्यात आले.

    सविस्तर बातमी नुसार असे कि, राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या 0 ते 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार हालचाली सुरु केल्या आहेत . या निर्णयामुळे तांडा, वस्ती, वाड्यावरील विद्यार्थ्याचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असुन पुढील भवितव्या आंधारात जात आहे. या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गरीब कुटूंबातील असुन सद्याच्या महागड्या काळात शिक्षण घेणे देखील सोपे राहिले नाही . त्यामुळे जर या शाळा बंद झाल्या तर या विद्यार्थ्याची संपुर्ण पिढी वाया जाणार आहेत . कारण गावात शाळा म्हणून आई वडील आपल्या मुलांना शाळेत पाठवतात जर हेच बंद झाले तर या मुलांचे काय होणार अशी चिंता सगळीकडे व्यक्त केली जात आहे . 

    यामध्ये महाराष्ट्रातील विशेषकरून तांडा, आदिवासी पाडे,डोंगर दर्यातिल शाळांचा देखील समावेश असून बहुतांश विद्यार्थी डोंगर दर्यात , वाडी वस्तीत , तांड्यातील आदीवासी दलीत , गोर बंजारा बहुजन वर्गातील विद्यार्थी आहेत . जे शिक्षण पासून कोसो दुर आहेत यामुळे त्यांच्या शिक्षण हक्क हिरावण्याचे काम केंद्र सरकार अन् महाराष्ट्र शासन करीत आहे या शासन निर्णयाविरोधात यावेळी उपस्थित संघटनेचे कार्यकर्ते गोरसेना तालुका अध्यक्ष पंडित पवार, तालुका उपाध्यक्ष राहुल चव्हाण, तालुका सचिव उमाकांत पवार, जिल्हा सहसंघटक बालाजी पवार, तालुका प्रसिद्धीप्रमुख अनिल चव्हाण, देवणी शहर अध्यक्ष देविदास राठोड, शाखा उपाध्यक्ष राहुल चव्हाण इत्यादी

Powered by Blogger.