डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयाला फार्मसी अभ्यासक्रमा करिता सुविधा केंद्राची मान्यता
मलकापूर प्रतिनिधी
स्थानिक डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला बी फार्म, डी.फार्म, एम.फार्म अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असे सुविधा केंद्राची मान्यता देण्यात आली आहे.
फार्मसी मध्ये इयत्ता बारावी नंतर प्रवेश घेण्यासंदर्भात विविध प्रवेश प्रक्रिया पार पाडावी लागतात त्या अनुषंगाने प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष करीता विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरणे, मेरिट लिस्ट चेक करणे, विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरणे या सुविधा केंद्रामार्फत केंद्रीय भूत प्रवेश प्रक्रिये संबंधातील अडचणी व मार्गदर्शन हे सुविधा केंद्रामार्फत विनामूल्य देता यावे याकरिता महाविद्यालयात सुविधा केंद्रांची मान्यता देण्यात येते.
ही मान्यता संबंधित महाविद्यालयात अद्ययावत सोयी सुविधा संगणक प्रणाली प्रयोगशाळा आवश्यक उपकरणे सुसज्ज इमारत पुरेशी बैठक व्यवस्था, त्याचबरोबर अनुभवी व तज्ञ शिक्षक रुंद अशा सर्व बाबींचा विचार करूनच मान्यता देण्यात येत असते. शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये या सुविधा केंद्रात मास्टर ऑफ फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी (डायरेक्ट सेकंड इयर), डिप्लोमा इन फार्मसी अश्या अभ्यासक्रमांचा समावेश राहणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील व मलकापूर तालुक्यातील व या परिसरातील विद्यार्थ्यांची व पालकांची प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्र बाबत गैरसोय होऊ नये याकरिता ही मान्यता देण्यात आली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांनी फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.