नवरात्री उत्सव निमित्य विश्व हिन्दू परिषद, मातृशक्ति, दुर्गा वाहिनी मलकापुर द्वारा आयोजन
मलकापूर प्रतिनिधी
आईचे आपल्यावर असंख्य उपकार असतात त्या उपकारांची आपण परतफेड कधीच करू शकत नाही. असे मोलाचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री गोविंद जी शेंडे यांनी नवीन पिढीला दिले.नवरात्री उत्सव निमित्य विश्व हिन्दू परिषद, मातृशक्ति, दुर्गा वाहिनी मलकापुर द्वारा आयोजन पं. पू डॉ. हेडगेवार सभागृह मलकापूर येथे दि.30 सप्टेंबर करण्यात आले.
विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री गोविंदजी शेंडे पुढे बोलताना म्हणाले की हिंदु स्त्रिया लव्ह जिहादला बळी पडू नयेत यासाठी संपूर्ण हिंदु समाजाने योग्य ती काळजी घेणे ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे. हिंदूंनो, आता संघटित होऊन ‘लव्ह जिहाद’च्या षडयंत्राला नामोहरम करूया आणि हिंदू मुलींचा मौल्यवान ठेवा जपून आपला सांस्कृतिक वारसा वाचवा. असे आवाहन वि.हि.प प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केले.
कार्यक्रमाचे व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्रा. पुनम ताई बाहेती मॅडम ह्या होत्या . तर प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिन्दू परिषद प्रांत मंत्री मा. गोविंदजी शेंडे हे होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्याध्यक्ष अश्विन भाई पटेल विश्व हिंदू परिषद तालुका प्रमुख संमती जैन, तालुका उपाध्यक्ष सौ. मायाताई वानखडे, मातृशक्ती संयोजिका सौ.स्नेहा ताई सदावर्ते, मातृशक्ती नगर सत्संग प्रमुख भारतीताई वैष्णव, दुर्गा वाहिनी संयोजिका कु.प्रिति ताई फाटे हे होते.
यावेळी शहरातून दुर्गा वाहिनीचे पथसंचलन गोविंद विष्णु महाजन विद्यालय पासून ते चांडक विद्यालय पर्यंत काढण्यात आले.विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री गोविंद जी शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितित नऊ कन्या पूजन,शस्त्र पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. सौ.पूनमताई यांनी उपस्थितित मातृशक्तिला नारी अबला नही सबला या विषयावर प्रबोधन केले. तर प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री गोविंद जी शेंडे यांनी या वेळी दुर्गा वाहिनी व मातृशक्ती यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शेकड़ोच्या संखेत महिला व मूली उपस्थितित होत्या .
गरबा उत्सवात लव्ह जिहाद सारख्या घटना घडू नये गरबा उत्सवात श्रद्धा नसतानाही अनेक इतर धर्मीय प्रवेश करतात. हिंदू महिला, तरुणींची छेड काढतात. पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. गरबा उत्सव हा श्रद्धेचा, उपासनेचा विषय आहे. तो सार्वजनिक इव्हेंट नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश दिला जावा. त्यासाठी प्रत्येकाचे आधारकार्ड तपासले जावे.गोविंदजी शेंडे. विदर्भ प्रांत मंत्री विश्व हिंदू परिषद .