Breaking News
recent

रुग्ण सेवक योगेश नासरे यांच्या मदतीने युवकाला मिळाले जीवनदान

चंद्रपुर प्रतिनिधि अमान क़ुरैशी

  गडचिरोली  आज दिनांक १७/१०/२०२२ रोजी श्रीरंग जेंगठे मु.पो ईटाळा हा तरुण काही कामा निमित्य गडचिरोली येथे गेला होता आपले कामे आटोपुन सायंकाळी परत  आपल्या दुचाकी वाहनाने गावी परत येत असतांना अज्ञात वाहनाने वाहनाच्या मागून धड़क देऊन पळून गेला. गंभीर जख्मी अवस्थेत रस्तेच्या कडेला पडला होता. या गम्भीर घटनेची  माहिती सिंदेवाही नगरपंचायतचे उपाध्यक्ष मयूर सूचक यांना मिळताच यांनी रुग्ण सेवक योगेश नासरे गडचिरोली यांना फोन करून माहिती दिली.

  योगेश ने वेळीच घटनास्थळी येऊन स्वताच्या रुग्णवाहिकेने तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गड़चिरोली येथे  दाखल केले. डॉक्टरानी प्रथोमउपचार कले परंतु डोक्याला जबर मार असल्याने डाक्टरांच्या सूचनेप्रमाने तात्काळ महत्वाच्या उपचारासाठी मध्यरात्रि २ वाजता च्या सुमारास मेडिकल कॉलेज नागपुर येथे पाठवींन्यात आले रुग्ण सेवक योगेश नासरे यांच्या वेळीच मदतीमुळे श्रीरंगला तात्काळ आरोग्य उपचार झाल्याने  जीव जाता जाता वाचले योगेश नासरे हे गडचिरोली जिल्ह्यात रसत्यात होत असलेल्या अपघाता मधे वेळीच पोहचुन मदत करणारे प्रसिद्ध वेक्ति असल्याची ओळख आहे.

Powered by Blogger.