निपाणा येथील जामीनावर सुटलेल्या आरोपींकडून न्यायालयाच्या निर्देशांचा भंग !
![]() |
ग्रामस्थांनी एसटी बस थांबवून आरोपींना केले पोलिसांच्या स्वाधीन एसटी बस थांबविल्या प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल |
मलकापूर
याबाबतची माहिती अशी की, मोताळा तालुक्यातील मौजे निपाणा येथील एका प्रकरणामध्ये मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये आरोपींपैकी तीन महिला व दोन पुरुष बळीराम तांदुळकर, विनोद सिताराम तांदळकर हे न्यायालयाच्या जामीनावर नियम, शर्ती, अधीन राहून आज बाहेरआलेले होते. त्यांना गावात येण्यास बंदी असल्याचे निपाणा येथील ग्रामस्थांनी सांगितले. त्यातील हे पाच आरोपी आज १९ ऑक्टोबर रोजी बस क्र.एमएच ०६ एस ८०३७ वडजी ते मलकापूर यामध्ये निपाणा बस थांब्यावरून मलकापूरकडे येण्यास निघाले होते. ते आरोपी न्यायालयाने दिलेल्या शर्ती व अटींचा भंग करीत गावात राहात असल्याने त्यांनी सकाळी मलकापूरकडे या बसमध्ये ग्रामस्थांसह निपाणा येथील विनोद रामा थाटे, नंदकिशोर रामसिंह राजपूत यांनी ती बस पोलिसांच्या स्वाधीन केले. पिंपळगाव - बोदवड रोडवरील मलकापूर शहर नजीक असलेल्या सालीपुरा रोडवर चालक शिवाजी थांबवून ग्रामीण पोलीसांना माहिती देवून त्यांना ताब्यात घेण्याकरीता कळविले.सदर बस ज्याठिकाणी थांबविण्यात आली ती हद्द गुन्हे दाखल करण्यात आलेले
नसल्याने ग्रामीण पोलिसांनी थातूर-मातूर कारवाई करण्याची भूमिका घेतली असता संतप्त ग्रामस्थांनी याविरुध्द रोष व्यक्त करताच ती हद्द शहर पोलिसांची असल्याने त्याठिकाणी शहर पोलीस दाखल होवून त्यांनी सदरची बस मलकापूर शहर आरोपींची शहनिशा करून त्यांना ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या स्वाधीन केले मलकापूर एस.टी. आगाराची बस थांबविल्याने उत्तमराव जगदाळे रा. मलकापूर यांचे फिर्यादीवरून विनोद रामा थाटे, नंदकिशोर रामसिंह राजपूत यांचे विरूध्द अप.नं. ४३८/२२ नुसार कलम ३४१, १८६, ३४ भादंवि नुसार गुन्हे दाखल आहे.
न्यायालयाने दिलेल्या शर्ती, अटींचा आरोपींनी भंग केल्याच्या प्रकरणी प्रश्न निर्माण झाल्याने सदर मलकापूर शहर पोलिसांनी 'त्या' पाच आरोपींना ग्रामीण पोलिसांच्या येण्यास निघाले असता पो.स्टे. ला आणून त्या पाच ताब्यात दिले. त्यावरून न्यायालयाचे आदेश काय आहे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तो आदेश मिळालेला नाही. त्यामुळे ६ आरोपींपैकी तीन महिलांना सोडण्यात आले आहे. तर तीन पुरुष आरोपींबाबत न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर याबाबत वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील.