तामगांव पोलिसांत मुलीस पळवल्या प्रकरणी युवका विरुद्ध गुन्हा दाखल
मतिन शेख,प्रतिनिधी संग्रामपुर
संग्रामपुर तालुक्यातिल कुंभारखेड येथिल अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन पळवुन नेल्याची घटना २० ऑक्टोंबर रोजी घडली.सदर घटनेची तक्रार मुलीच्या आईने तामगाव पोलिसात दिली. मुलीच्या घरा जवळ शेजारी राहणारा प्रविण शेगोकार हा सुद्धा गावात नसल्याचे आढळून आले आहे. प्रविण ने मुलीच्या आईकडे लग्नाची मांगणी केलेली होती.व माझे तुमच्या मुलीवर प्रेम सुद्धा आहे. असे प्रविणने त्या मुलीच्या आईला सांगितले होते.परंतु मुलीच्या आईने माझ्या मुलीचे शिक्षण सुरु आहे. शिक्षण पुर्ण झाल्यावर मुलीचे लग्न करु, अशे मुलीच्या आईने प्रविणला सांगितले होते. जेव्हा मुलीचे आई-वडील शेतात गेले होते.घरात कोणीच नसल्याची संधी साधून मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रविण संतोष शेगोकार याने मुलीस फुस लावून पळून नेले. पोलिस दोघांचाही शोध घेत आहे.पुढिल तपास ठानेदार प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार मेश्रे हे करत आहेत.