श्री.शिवाजी महाविद्यालयात वन्यजीव रांगोळी स्पर्धा संपन्न
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
स्थानिक श्री.शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात १ ऑक्टो ते ८ऑक्टो वन्यजीव सप्तहानिमित्त दि.४ ऑक्टो रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मीना निकम व चमूने जंगलतोड व वाढते शहरीकरण, औद्योगिकरण यामुळे पशूपक्षांच्या अधिवासावर होणारे मानवी आक्रमण व त्यातून उद्भवणाऱ्या मानव व वन्यप्राणी संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. मह्त्वाच्या वन्यप्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.मानव व वन्यजीव यांच्यात मैत्री असणे ही पृथ्वीची गरज आहे. नामशेष होत चाललेल्या अशा वन्यजीवाबाबत जनजागृती करण्यासाठी भारतात दरवर्षी १ ते ८ ऑक्टोबर हा सप्ताह आयोजित करण्यात येतो.
वन्यप्राण्यांच्या सावर्धनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नाविषयी जनजागृती हा त्यामागचा उद्देश आहे.त्यामुळे हया रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख यांच्या उपस्थित प्रा.शालिनी कटोले यांनी उद्घाटन केले व विद्यार्थ्यांनी विविध वन्यजीव जसे वाघ, चित्ता, ससा,हरीण, पांडा, पेंगविन, नाग, कासव, हत्त्ती यासारखे वन्यजीव रांगोळीतून रेखाटताना वन्यजीवांचे अन्नसाखळीतील स्थान व वन्यजीवांच्या सवर्धनाचे महत्त्व रांगोळीतून प्रतिबिंबित केले.प्रा. मुकुंद कोलते व प्रा. सोनाली गायकवाड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले या स्पर्धेत प्राणीशास्त्र विभागातील २८ विद्यार्थी सहभागी झाले होते.विजेत्या स्पर्धकांचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीना निकम यांनी कौतुक करून अभिनंदन केले.या स्पर्धेचे आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी डॉ.मीना निकम, डॉ.हेमके, डॉ.राजेन्द्गा गाढे ,रहीम शेख यांनी परिश्रम घेतले.