बहापुरा ग्रामपंचायत येथील दिव्यांग ग्रामसेवकांना मारहाण करणे बाप लेकाला पडले महागात पोलिसांनी बाप लेकाला तात्काळ केली अटक
मलकापूर:-
मलकापूर तालुक्यातील बहापुरा ग्रामपंचायत येथील बाप लेकांनी अपंग ग्रामसेवक यांना धमकावणे, लोटपाट, करून ग्रामपंचायत मध्ये धिंगाणा घातल्या प्रकरणी अपंग ग्रामसेवक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खाप लेकाला केली अटक. सविस्तर वृत्त असे की मलकापूर येथील बहापुरा ग्रामपंचायत मध्ये जयवर्धन नानाराव इंगळे हा कर्मचारी म्हणून यांची नेमणूक करण्यात आली होती, काही दिवसांनंतर काही कारणास्तव ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून जयवर्धन नानाराव इंगळे याला ग्रामपंचायत मधुन काढण्यात आले.
तसा ग्रामपंचायत मध्ये सर्वांनी मते ठराव मंजूर सुध्दा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली त्या अनुषंगाने आरोपी (१) नानाराव थोडिराम इंगळे वय ५५ (२) हर्षवर्धन नानाराव इंगळे वय २७ या दोघा बाप लेकांनी दोन्ही आरोपी जयवर्धन चे भाऊ व वडील असल्याने जयवर्धन नानाराव इंगळे याला ग्रामपंचायत मधुन काढण्यात आल्याने दोन्ही आरोपी ग्रामसेवकाला वारंवार त्रास देत होते. या पार्श्वभूमीवर जयवर्धन नानाराव इंगळे यांचे पगारा वरुन ग्रामसेवका सोबत पैसे कमी जास्ती या कारणावरून दोन्ही बापलेकांनी ग्रामसेवक यांचे कामा करत असलेले कागदपत्रे फेकाफेक करून धमक्या देत ग्रामसेवकांची कॉलर पकडुन लोट पाट केली, शिवीगाळ केली.
अपंग ग्रामसेवकाने मोठ्या हिमतीने पोलिस स्टेशन गाठले. मलकापूर पोलिसांनी तातडीने अपंग ग्रामसेवक गजानन इनके यांच्या फिर्यादीवरून अ.क्र. ४४० / २०२२ कलम ३५३,३३२,५०४, ५०६, भादवी सह कलम ९५ (ए) ९५ (बी) अपंग व्यक्ती कायदा २०१६ अंतर्गत आरोपी १) नानाराव धोंडिराम इंगळे वय ५५ (२) हर्षवर्धन नानाराव इंगळे वय २७ या दोन्ही बाप लेका वर गुन्हा दाखल करण्यात आला व दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकरे करीत आहे.