मलकापूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे पथसंचलन
मलकापूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मलकापूर नगर चे पथसंचलन नुकतेच पार पडले. नगरातील ली. भी. चांडक विद्यालयाच्या प. पू. डॉ. हेडगेवार सभागृहासमोरील प्रांगणातून सुरुवात झाली. यावेळी पथसंचलन सुरू होण्याअगोदर उपस्थित स्वयंसेवकांनी प्राथनेचे गायन केले.
त्यानंतर सर्व गणवेषधारी स्वयंसेवकांचे पथसंचलन प्रथम अब्दुल हमीद चौकापासून सरळ निमवाडी चौक ते हनुमान चौकातून तहसिल चौकापर्यंत आल्यानंतर तेथील डॉ. सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला दामोदरजी लखानी नगर संघचालक यांनी माल्यार्पण करून त्यानंतर सादर प्रणाम करून तहसिल चौकापासून पुढे गांधी चौक ते पोलीस चौकी नं.१ ते नसवाला चौकातून पुढे मंगलगेट पासून सरळ लखाणी चौकातून परत लि. भी. चांडक विद्यालयाच्या समोरील मैदानावर आले. याप्रसंगी नगरातील बंधू - भगिनी तथा राष्ट्र सेविका संघाच्या वतीने रस्त्यावर सजावट केलेली होती. रागोळ्यांची सुंदरसजावट केली होती.
पथसंचलन ज्यावेळी प्रत्येक चौकातून जात असतांना माता-भगिनी तथा नगरातील बंधूनी पथसंचलनावर फुलांचा व पुष्पगुच्छांचा वर्षाव करीत होते. यावेळी नगरातील वातावरण संघमय झालेले होते. माता-भगिनी तथा नगरातील लोकांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.