शहरातील सावजीफैल परिसरातील २२ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या,परिसरात शोककळा
मलकापुर
मलकापुर शहरातील सावजीफैल परिसरातील २२ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास समोर आली.या प्रकरणी मलकापुर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुभम राजु चव्हाण वय २२ वर्ष, असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम चव्हाण हा तरूण आपल्या आई बाबासह वास्तव्याला आहे. शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या वेळी शुुभमची आई शेजारी गेली असता शुभम हा घरात एकटा होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास शुुभमने राहत्या घरात पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट शेजारील नागरिकांच्या मदतीने त्याला खाली उतरवून उपजिल्हा रूग्णालयात शविच्छेदणासाठी दाखल केले आहे