संविधानाच्या सरक्षणाकरिता एक जुटिने भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा---विजय अंभोरे
प्रतिनिधी
देशाचा आत्मा हा संविधान असून त्यानुसार गेली सत्तर वर्षापासून देशात शांतता नांदुन देशाचा सर्वांगीण विकास झाला आहे मात्र गेली काही दिवसांपासून संविधानावर सातत्याने घाव घालण्याचा प्रकार धर्मांध शक्ती करीत आहे .त्यामुळे आपण सर्वांनी भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी सज्ज होऊन देशातील नागरिकांमध्ये निर्भय बनून भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी शेगाव येथे आयोजित जिल्ह्यातील मातंग समाज बैठकीत केले
.या वेळी सभेमधील उपस्थितांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुलजी वासनिक साहेब,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर,बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहूल भाऊ बोंद्रे या मान्यवरांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संबोधित केले.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांची भारत जोडो पदयात्रा बुलढाणा जिल्ह्यात आगमन करीत असून या यात्रेचे स्वागत करून सहभागी होण्याकरिता अण्णाभाऊ साठे सोशल फोरम च्या वतीने बुलढाणा जिल्हा मातंग समाज कार्यकर्त्यांची जिल्हा स्तरीय नियोजन बैठक आज शेगाव येथे पार पडली
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम चे संस्थापक विजय अंभोरे हे होते तर यावेळी भा राका चे पक्षनेते ज्ञानेश्वर दादा पाटील,स्वातीताई वाकेकर ,मंगला पाटील ,कविता झाडोकर,साहेबराव पाटोळे ,बी के खरात ,संतराम तायडे ,प्रमोद दादा अवसर्मोल , शैलेश खेडेकर,भैया जयस्वाल ,राजेंद्र वानखेडे,निवृत्ती तांबे लक्ष्मण गवई,सोपान पानपाटील,भगवान गायकवाड,वामन गुडेकर, कृष्णा नाटेकरआदींची यावेळी उपस्थिती होती .
या वेळी आयोजित नियोजन बैठक बाबत सोपान पानपाटील यांनी मार्गदर्शन केले, संतराम तायडे , ज्ञानेश्वर दादा, स्वाती ताई वाकेकार,मंगला पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील मातंग समाजाचे कृष्णा नाटेकर, मेजर शंकर आव्हाड, ,कृष्णा शिरगोळे दिलीप सोनोणे, महेंद्र वानखेडे,विजय सकल्कर,ईश्वर मानकर,सुरेश सोनोने ,देविदास मानकर सुरेश वानखेडे, भास्कर आघम ,दामोधर सुरडकर,रवी चव्हाण,मनोहर तायडे,गजानन तायडे,सोपान वानखेडे,संजय कांबळे,गणेश बांगर,बाबुराव मानकर,संग्रामपूर येथील संजय बापट, बाजोडे ,विनोद घोडे, अंजनकर ओम नाटेकर,राजू निकाळजे,लिंबाजी साळवे,बोरकर,मनवतकर साहेब,,गजानन सोनोन आदी सह जिल्ह्यातील मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मणराव गवई यांनी तर आभाप्रदर्शन भगवान गायकवाड यांनी केले