शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चिखली सभेच्या अनुषंगाने मलकापूर शहर व तालुक्याची नियोजन बैठक संपन्न
मलकापूर:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या चिखली येथील सभेसाठी मलकापूर शहर व तालुका शिवसेनेची नियोजन बैठक दि.13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. स्थानिक विश्रामगृहावर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील,जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संघटक राजेश सिंह राजपूत,तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील, शहर प्रमुख गजानन ठोसर, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश सुशीर, युवा सेना शहर प्रमुख पवन गरुड, कामगार सेना तालुकाप्रमुख रामभाऊ थोरबोले, किसान सेना शहर प्रमुख सै. वसीम, शिवसेना उपशहर प्रमुख शकील जमादार, बाळूभाऊ पोलाखरे, शेख समद कुरेशी तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुकाप्रमुख, शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत तालुका व शहरात जास्तीत जास्त शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करून दि.26 नोव्हेंबर रोजी चिखली येथे होऊ घातलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सभेला मोठ्या संख्येने चिखली येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केले.यावेळी रामराव तळेकर, हरीदास गणबास,मंगेश पाटील, आशिष पाटील, संतोष घोडके, ज्ञानेश्वर पाटील, विजय झांबरे, मधुकर चित्रंग, सुभाष कवळे, विशाल फुकटे,पंडित इंगळे, विनोद कचरे, सुरेश वाघ, अक्षय गणतीरे, सोहेल भाई, अनिल मोहेकर, मयूर ताटर,अभिषेक भोंबे, शिवम ढोले, दुर्गेश सनीसे, भूषण ढोले, अभिषेक ढोले सह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.