वरवट बकालच्या स्मशानभूमित अघोरी पुजा करणारे फरार, गावकर्यांमध्ये भितीचे वातावरण
संग्रामपुर तालुक्यातिल वरवट बकाल गावाजवळील रिंगणवाडी मार्गावर ४ ते ५ लोकांनी स्मशानभूमीत रविवारी रात्रीच्या सुमारास अघोरी विद्येची पुजा करण्याचा प्रकार उघडीस आला. रिंगणवाडी आणि वरवट बकाल येथील गावकर्यांना पूजेचा प्रकार कळतांच गावकर्यांनी रात्रीच स्मशानभूमीचा रास्ता पकडला. गावकर्यांना पाहून अघोरी पूजा करणारी टोळी अंधाराचा फायदा घेत पसार झाली. स्मशानभूमित वेगवेगळ्या ठिकाणी लिंबू ठेवलेले होते. लिंबाभोवती रांगोळी घालून तांदुळ, हळदकुंकू टाकण्यात आले होते. तसेच पूजेत मानवी कवटी, बदाम, केळी, पोत्यांचा बारदाना,घुबळ पक्षाचे पाय, वराहाचे दात, कासवाचे अवयव, तांब्याचा गडवा अशे इतर साहित्य आढळले.
गडव्यावर गोपाल रामभाऊ आमझरे असे नाव टाकलेले होते. स्मशानभूमीत साहित्य बघण्याकरीता सकाळ पर्यत नागरीकांची गर्दी उमटलेली होती. उपस्थित नागरीकांनी पूजेचे साहित्य जाळून टाकले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तामगांव पोलीसांनी तपास करुन या जादूटोणा करणार्या विरुद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी वरवट बकाल ग्रामस्थ करीत आहेत.