उन्नती महिला नागरी सहकारी पत संस्थेतील ठेवीदारांनी शांतता ठेवण्याची गरज-संचालक मंडळ
जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील उन्नती महिला नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचा ठेवी बऱ्याच दिवसांपासून परत मिळत नसल्याने ठेवीदारांचा संयम सुटत आहे. ठेवेदारांच्या ठेवी परत मिळण्याकरिता संचालक मंडळांनी आता कंबर कसली आहे.
व्यवस्थापकाच्या चुकीच्या धोरणामुळे संचालक मंडळांना सुद्धा हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे सध्या पतसंस्थेचे इंटरनल ऑडिट सुरू असून या ऑडिट करिता एक आठवडा किमान लागणार आहे ऑडिट झाल्यानंतर सत्य बाहेर येईलच. याकरिता ठेवेदारांनी संयम ठेवण्याची गरज आहे गेल्या आठवड्याभरापासून ठेवीदारांनी पतसंस्थेत गर्दी केल्यामुळे पतसंस्थेतील कामकाज हे गेल्या कित्येक दिवसांपासून ठप्प झाले आहे. संचालक मंडळांनी ठेवीदारांसोबत कित्येक वेळा बैठका सुद्धा घेतल्या मात्र त्या ठिकाणी गोंधळ उडत असल्याने त्यातून मार्ग काढणे ही कठीण झाले आहे याकरिता ठेवीदारांनी संयम ठेवण्याची गरज आहे