दोन दुचाकींची समोरासमोर धडक;एक ठार, तीन गंभीर दुरा-जळगाव जामोद मार्गावरील घटना
नांदुरा ते जळगाव जामोद राष्ट्रीय महामार्गावर नवी येरळी जवळ २३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान दोन दुचाकी समोरासमोर झालेल्या अपघातात एक ठार तर तीन गंभीर जखमी झाले.नांदुरा जळगाव जामोद राष्ट्रीय महामार्गावर नवी ऐरळी जवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. एका दुचाकीवर दोघे मित्र नांदुराकडे येत होते तर दुसऱ्या दुचाकीवरून पती पत्नी नांदुरा वरून जळगाव जामोदला जात होते. त्यापैकी आकाश भिमराव अबगड (वय २५ वर्षे) रा खुमगाव बुर्टी यांचा मृत्यू झाला.
त्याच दुचाकीवरील त्याचा मित्र भरत खंडारे गंभीर जखमी झाला. दुसऱ्या दुचाकी वरील जळगाव जामोदला जाणारे पती- पत्नी सुंदरसिंग राजपूत व सुरेखा राजपूत गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवले आहे. अपघाताची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनचे विलास निबोळकर, पियुष मिहानी, शिवा घाटे, विकी रामेकर, शंभू नालट, राजू बगाडे व कृष्णा नालट यांनी जखमींना तात्काळ ओम साई फाउंडेशनच्या ॲम्बुलन्सद्वारे खामगाव येथे उपचाराकरिता पोहोचविले.