Breaking News
recent

आगर व्यवस्थापक दराडे याने पीडित महिलेची सुट्टी मंजूर करून न घेता कामावरून काढून टाकले

 


    मलकापूर  येथील एसटी बस च्या आगार व्यवस्थापक दादाराव दराडे याने पीडित महिला नेहा भरगडे  लिपिक एसटी बस कर्मचारी या महिलेला कोण्यांना कोण्या कारणाने त्रास देऊन अखेर सुट्टी चा अर्ज मंजूर करून न घेताच कामावरून काढून टाकले आहे.याबाबत सविस्तर अशी की मलकापूर येथील एसटी बस कर्मचारी  लिपिक कर्मचारी नेहा भरगडे या महिलेला गर्भवती असताना पासून तर बाळ दीड वर्षाचे होईपर्यंत रात्री अहोरत्री  च्या वेळेस बोलून छळ केला आहे.

 अशा  एसटी बस आगार व्यवस्थापक  दादाराव दराडे यास निलंबित करून कारवाई करा  अशी मागणी अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई यांच्याकडे  स्नेहा आशिष भरगडे यांनी तक्रार केली आहे. तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की मी  नेहा भरगडे एसटी बस लिपिका माझ्या मुलीची तब्येत ठीक नसल्यामुळे दि. 12 नोव्हेंबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 पर्यंत नियोजित कामगिरीवर हजर राहू शकणार नाही तरी मला दोन दिवसाची अर्जित रजा देण्यात यावी असा विनंतीपूर्वक अर्ज करून देखील आगार व्यवस्थापकाने माझा अर्ज स्वीकारून न घेताच गैरहजर दाखवीत कामावरून काढून टाकले आहे.

तसेच माझे बाळ लहान असल्याकारणाने जनरल ड्युटी देण्यात यावी की जेणेकरून बाळाचे संगोपन योग्यरीत्या करता येईल असे वारंवार विनंती अर्ज देऊन देखील मला  सकाळी 5 ते दुपारी 2 दुसरी वेळ दुपारी 2 ते रात्री 10  अशा प्रकारे कार्यावर बोलून वारंवार त्रास देण्यात आला आहे. तरी मला योग्य तो न्याय देऊन मुजर एसटी बस आगार व्यवस्थापक दादाराव दराडे याला निलंबित करण्यात येऊन मला कामावर रुजू करून न्याय द्यावा अशी मागणी  अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई व महिला आयोग बुलढाणा, रा. प. म. व्यवस्थापक बुलढाणा त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

Powered by Blogger.