संत गाडगेबाबा स्मारक परिसर व विद्या विकास शाळेजवळ रहदारी व विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून दोन्ही बाजूने गतीरोधक बसविण्यात यावे- प्रहारची मागणी
मलकापूर
शहरातील बुलडाणा रोडवर असलेल्या संत गाडगेबाबा स्मारक परिसर व विद्या विकास शाळेजवळ रहदारी व विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून दोन्ही बाजूने गतीरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी २९ नोव्हेंबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महोदय, मलकापूर शहरातून बुलडाणा रोड गेला असून या रोडवर नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्या बरोबरच रहदारीचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यातच गाडगेबाबा स्मारक परिसर हा टी पॉईंट म्हणून ओळखला जातो. याच परिसरातून अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या रहदारीचा व बुलडाणा रोडवरील रहदारीचा त्रास सहन करावा लागतो. तेव्हा विद्यार्थ्यांच्या अडचणीचा विचार करता गाडगेबाबा स्मारक परिसरात बुलडाणा रोडवर दोन्ही बाजूने गतीरोधक बसविण्यात यावे. त्याचप्रमाणे वाकोडी ग्रा.पं. हद्दीत येत असलेल्या विद्या विकास विद्यालयातील विद्यार्थी सुध्दा बुलडाणा रोडने ये-जा करतात. तसेच हे विद्यालय बुलडाणा रोडच्या जवळच असल्याने या विद्यालयाच्या जवळपास बुलडाणा रोडवर दोन्ही बाजूने गतीरोधक टाकणे अत्यावश्यक आहे. गतीरोधक टाकल्यास याठिकाणी वाहनांचा वेग कमी होण्या बरोबरच रहदारीचा या परिसरातून जाणार्या विद्यार्थ्यांना त्रासही कमी होईल, अशी मागणी करण्यात आली आहे.