Breaking News
recent

मदत सेवाकार्याचा वसा हाती घेतलेल्या आधारपर्व फाऊंडेशनला यंदाचा 'यशवंतराव चव्हाण पुरस्कार' प्रदान



   अकोला जिल्ह्यांतील तालुका तेल्हारा येथिल आधारपर्व फाऊंडेशन यांना यंदाचा 'यशवंतराव चव्हाण' पुरस्कार मिळाला आहे दीड वर्षा पासुन गरीब गरजू अपंग निराधार यांना मदत व्हावी या मदत कार्याची जाणीव मनात ठेऊन त्यांना आपल्या परीने शक्य होईल मदत करून मदतीचा हात देऊया या विचारधारेने कार्य करत आलेल्या आधारपर्व फाऊंडेशनची सेवाकार्याचे कार्य बघुन घेऊन यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन, जया आलिंचंदानी फाऊंडेशन माध्यमातून सामाजिक समाजसेवा, पत्रकार, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सहकार, उद्योग, उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचे नवीमुंबई स्पोर्ट क्लब वाशी येथे सन्मान करून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

   या सोहळ्यामध्ये माजी मंत्री मा.लोकनेते गणेशजी नाईक,माधवीताई नाईक,आमदार विधानपरिषद मा श्रीकांतजी भारतीय,माजी खासदार मा.संजिवजी नाईक,चित्राताई वाघ जया आलिमचंदानी,सौ.पल्लवी चाडके,सौ.रेखा आंबुळकर, संजय सावंत,तथा विशेष प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन,जया आलिमचंदानी फाऊंडेशनच्या वतीने 'यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन आधारपर्व फाऊंडेशन अध्यक्षा श्रध्दा विशाल गढे,कार्यकारी सदस्या सुनिता ताथोड यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.आधारपर्व फाऊंडेशनचे नेहमी गरीब गरजु अपंग निराधार यांना करत असलेल्या मदतकार्या विषयी सर्व स्तरावरुन कौतुक होत असुन यंदाचा त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाल्याचे कळताच सर्व स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

    समाजातील तळागाळातील शोषित गरजु अपंग निराधार यांना मदत करण्याची जी शक्ती  मिळाली व आज त्या सेवाकार्याची पावती पुरस्कार म्हणून प्राप्त झाली याचे सर्व श्रेय माझा सर्व आधारपर्व परिवारातील सदस्यांच्या अनमोल सहकार्यानेच असे अध्यक्षा श्रध्दा गढे यांनी कळविले.आधारपर्व फाऊंडेशन सर्व सदस्यांच्या सहकार्याने करत आलेल्या मदत सेवाकार्याची आज जी पावती मिळाली त्या बद्दल यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन ,जया आलीम चंदानी फाऊंडेशन यांचे मुख्य कार्यकारी अमोल बावस्कार यांनी आभार मानून आधारपर्व फाऊंडेशनचे  सेवाकार्य असेच गरजुंच्या मदतीसाठी सदैव अखंडित सुरु ठेऊन लवकरच बेघरांना आश्रयाचा सहारा आधारपर्व फाऊंडेशन वतीने देण्यात येणार असे अमोल बावस्कार यांनी कळविले.

Powered by Blogger.