लिगल फायटर्स फाउंडेशन च्या वतीने संविधान दिवस थाटात साजरा
लिगल फायटर्स फाउंडेशन गेल्या ४ वर्षापासुन सामाजीक क्षेत्रामध्ये तसेच गावोगावी कायदेविशयक व संविधानाबाबत जनजागृती करीत आहे वब जेथे जेथे अन्याय होत असेल तेथे कायदेशीर लढा देत आहे. गरजुंना न्याय देत आहे. लिगल फायटर्स फाउंडेशने कोराना सारख्या परीस्थीतीमध्ये गरजुंना मदत केली आहे.
संविधान दिनानिमीत्त संविधान जनजागृती व्हावी हा उददेश लक्षात घेउन संपुर्ण शहरामध्ये २ दिवस आधीपासून भारतीय राज्य घटनेच्या कलमांबाबत सविस्तर माहीती मलकापुर येथील सर्व समाजातील वकिल बांधवांना सोबत घेउन लिगल फायटर्स फाउंडेशन तर्फे बॅनर लावण्यात आले. त्या बॅनरची संपूर्ण तालुक्यात चर्चा होती. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ,रेल्वे स्टेशन जवळ जाहीर संविधान उद्देश पत्रीका वाचनाचा व मार्गदर्शनाच्या कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शन अँड.साहेबराव मोरे यांनी केले. तसेच जेष्ठ समाजसेवक सु.मा.शिंदे,राजाभाउ सावळे जिल्हा अध्यक्ष पि.री.पा. A,, डॉ.सै.महेबुब यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थितीमध्ये भाउसाहेब सरदार,अड.अरूण इंगळे,मा.नगरसेवक शहेजाद खान,अड राहल ठाकरे,अँड जयंत तायडे,अँड सुनिल मराठे,डॉ.अशोक सुरडकर, अँड. पवन मेहेंगे आदी होते.
यावेळी वाघुड येथील कु.यशस्वी वानखेडे हीने संविधानपर सुंदर गित गायीले.नंतर लिगल फायटर्स फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अँड स्नेहल तायडे. यांनी अध्यक्षीय भाषण केले.संविधान जनजागृती अखंड सुरू राहील असे वक्तव्य केले.यावेळी प्रभारी पोलिस निरीक्षक मा. बोरखेडे साहेब यांच्या मार्फत पोलिस स्टेशन मलकापूर शहर ला उद्देश पत्रिका भेट दिली.
तेव्हा 'लिगल फायटर्स फाउंडेशन चे अधिकारी , अड. रविंद्र निकम,अँड सुबोध इंगळे, सै. ताहेर, विलास तायडे,सुपडा ब्राम्हणे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास परीश्रम घेतले कार्यकमाचे सुत्रसंचालन अँड.देवकुमार वानखेडे यांनी केले.अँड विशाल इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले.