
मलकापूर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे करण्यात आले होते .यामध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्स क्रिकेट संघाने विजेते पद पटकावले आहे. १७ वर्षा आतील क्रिकेट संघ जिल्हास्तरावर खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. मलकापूर तालुका स्तरीय शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या १७ वर्षा आतील क्रिकेट संघाने सुरुवातीच्या सामन्यात चांडक विद्यालयाला पराभूत केले. तर उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी असलेल्या एम. एस. एम इंग्लिश शाळेच्या संघाला पराभूत करून अंतिम सामन्या करिता आपले स्थान निश्चित केले. व अंतिम सामन्यांमध्ये यशोधाम पब्लिक शाळेच्या संघाला पराभूत करून जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धाकरिता आपले स्थान निश्चित केले. याविजयी १७ वर्षा आतील संघामध्ये कर्णधार फराज पाशा ,ओम काळबांडे ,अंकित झाल्टे, अनुज देशमुख, आर्यन निंबोळकर,कल्पेश भिरूड, वेदांत बोरले,शिवराज पाटील, शौर्य धुरत, साहिल जगताप, सिद्धांत चौधरी, हर्षझंवर, मोहित ठाकूर, हितेश नानवानी, सिद्धांत भुतडा,पलाश अग्रवाल या खेळाडूंचा समावेश आहे. या शालेय क्रिकेट क्रीडास्पर्धा जिल्हाक्रीडा अधिकारी गणेश जाधव , तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे, बुलढाणा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत साळुंके सरतसे मलकापूर क्रीडा संयोजक दिनेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. विजयी संघाच्या यशाबद्दल शाळेचे संचालक अमरकुमार संचेती प्राचार्य सुदी प्ता सरकार व उपप्राचार्य केदार शर्मा आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .या विजयी संघाला शाळेचे क्रीडा शिक्षक स्वप्नील साळुंके, ओम गायकवाड व मानसी पांडे यांनी मार्गदर्शन केले आहे. या यशाबद्दलसर्व स्तरात विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.