Breaking News
recent

राज्य शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सार्वजनिक क्षेत्रातील ग्रंथालय कर्मचारी उचलताय आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल--डाॅ. गजानन कोटेवार

 


नांदुरा प्रतिनिधी

 राज्य  शासनाने मागील दहा वर्षापासून सार्वजनिक क्षेत्रातील ग्रंथालयांच्या  अनुदानात वाढ केलेली नाही.त्यामुळे अतीशय  तुटपुंज्या मानधनावर कर्मचारी आपला संसाराचा गाढा हाकत आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसात आत्महत्या केल्या असुन दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रंथालयातील कर्मचारी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलत  असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य  ग्रंथालय संघाचे  प्रदेशाध्यक्ष डाॅ. गजानन कोटेवार यांनी केला . ते स्थानिक स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात दि.२५ नोव्हेंबरला तालुका ग्रंथालय कार्यशाळा व कार्यकर्ता मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना केला.ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी आपण लढा देत असुन त्याकरीता दोनशे आमदारांच्या सह्याचे पत्र आपण शासनाकडे दिले असल्याचे ह्यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाची सुरूवात प्रथमतः दीपप्रज्वलन व ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ .एस.आर.रंगनाथन यांच्या फोटोला माल्यर्पणाने झाली.जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनंत सातव यांनीही मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुलडाणा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॅ. राजेंद्र गणगे यांनी तर संचलन  विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे सचिव विजय सारभुकन व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष गजानन डोंगरकार यांनी  केले.ह्यावेळी विविध ग्रंथालयाचे ग्रंथपाल व अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. { संत   गजानन महाराजांची नगरी असलेल्या शेगांवमध्ये दि.१४ व १५ जानेवारी २०२३ ला आयोजित केलेल्या  ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन  यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील ३७० ग्रंथालयानी परीश्रम घेऊन यशस्वी करण्याचे आव्हान डाॅ .कोटेवार यांनी ह्यावेळी केले. त्यामुळे शासन व उपस्थित पाहुण्यांना आपल्या संघ शक्तीचे दर्शन होईल. }

Powered by Blogger.