Breaking News
recent

शेतकऱ्यांना 100 टक्के पिक विमा मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांना अभय पाटील यांचे निवेदन


    चांदुर बिस्वा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 2022 - 23 या वर्षी पिक विमा भरलेला होता अति पावसामुळे सोयाबीन कापूस उडीद मुंग ज्वारी बाजरी तुर इ. पिकांचे अतोनात नुकसान  झाले शेतकऱ्यांनी यासंदर्भात लेखी  व ऑनलाईन तक्रार  पिक विमा कंपनीने केल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतात येऊन सर्वे केलेले आहे परंतु गेल्या तीन चार दिवसापासून परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा रक्कम जमा होत आहे ति पण अगदी अल्प प्रमाणामध्ये पिक विम्याची रक्कम  शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे.

 त्यामुळे 100 टक्के पिक विमा  मिळावा याकरिता चांदुर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशन अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी नांदुरा यांना निवेदन दिले निवेदनात नमूद आहे की चांदूर  मंडळातील शेतकऱ्यांना 2022 -2023 चा  पिक विमा भरलेल्या होता तो मिळाला परंतु  अल्प प्रमाणामध्ये पिक विमा देऊन पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आजपर्यंत अनेक निवेदन देऊन सुद्धा प्रशासन कुंभकर्ण झोपेत आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असून शेतकऱ्यांना 100 टक्के पिक विमा 8 दिवसाच्या आत  शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा असे न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यास येईल असे म्हटले आहे सदर निवेदनावर शेतकऱ्यांच्या सहया आहेत व सदर निवेदनाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा कृषी अधिकारी बुलढाणा, तहसीलदार नांदुरा, यांना आहेत

Powered by Blogger.