Breaking News
recent

बुलडाणा जिल्ह्यात 80.47% मतदान

 प्रतिनिधी

जिल्ह्यातील २६१ ग्रामपंचायतींच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीसाठी आज, १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत एकूण ३ लाख ७७ हजार १२५ मतदारांपैकी ३ लाख ३ हजार ४९० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानुसार या मतदानाची अंतिम आकडेवारी ८०.४७ अशी राहिली. दरम्यान, मंगळवारी, २० डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे.

 यावेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा पारंपरिक साचा बदलू लगल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रत्यक्ष सर्वेक्षणानुसार सुशिक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही सुशिक्षित मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मतदानासाठी अपंग मतदारांनी मलकापूर आपल्या मतदानाचा हक्क बजावून मतदानासाठी न उतरणाऱ्या मतदारांच्या डोळ्यांत अंजन घातल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेलया २७९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सरपंचपदाच्या २१, तर ग्रामपंचायत सरस्यपदाच्या ७३५ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे उर्वरित जागांसाठी मतदान घेण्यात आले. 

ग्रामपंचायतींच्या उमेदवारांचे भवितव्य 'ईव्हीएम' मध्ये बंद


     यामध्ये सरपंचपदाच्या २५१ आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या एक हजार ५४७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. २६१ग्रामपंचायतींच्या मतदानास ८४२ केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. सुरुवातीला संथगतीने सुरू असलेल्या मतदानाला दुपारनंतर वेग आला. अनेक केंद्रांवर दुपारनंतर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. यामध्ये महिला आणि युवकांचा उत्साह अधिक दिसून आला.

दुपारी साडेतीन वाजेपर्यंत दोन लाख ७७.७५ ५६ हजार ७९० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मतदानात वाढ झाली. त्यानुसार सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ३ लाख ७७ हजार १२५ मतदारांपैकी ३ लाख ३ हजार ४९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


 *बुलडाणा जिल्ह्यातील तालुका निहाय मतदान*

बुलढाणा 67.43          चिखली 79.78            देऊळगाव राजा 83.78        सिंदखेडराजा 83.37

मेहकर 84. 41            लोणार 82.39            खामगाव 82.23                शेगाव 84.55

जळगाव जामोद 79.94    संग्रामपूर 76.13     नांदुरा 80.90            मोताळा 76 .06

मलकापूर 77.75


Powered by Blogger.