विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोतवाल संघटने चे तहसीलदाराला निवेदन
मलकापूर तालुका कोतवाल संघटनेने तहसिलदार, मलकापूर यांना विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी विधान भवन, नागपुर येथे दिनांक २८/१२/२०२२ रोजी होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याबाबत निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटने व्दारे दि २८ डिसेंबर २०२२ रोजी विधान भवन नागपुर येथे चतुर्थ श्रेणी होईपर्यंत सरसकट १५०००/- रुपये मानधन व अन्य मागण्याच्या पुर्ततेसाठी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन या मोर्चात मलकापूर तालुका कोतवाल संघटना सहभागी असल्याबाबत तहसिलदार, मलकापूर यांना निवेदन देण्यात आले असुन सदर निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष श्री सुरेश दाते, तालुका उपाध्यक्ष श्री राहुल पाटील व तालुका सचिव श्री सुरेश तायडे, निलेश तायडे, सचिन चोपडे, संतोष चोपड़े, सुनिल न्हावकर, विनोद नारखेडे, भगवान इंगळे, सतिष राठोड, निलेश मात्रे, पंकज जाधव, राजु वसतकार, रिंतु दिक्षीत, अनिता गवई, संगीता चव्हाण, सुनिता मुसेकर आदी कोतवाल उपस्थित होते.