साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शाळा क्र.4 पूर्वी च्या जागेवर सुरु करा. : स्वाभिमानीची मागणी
![]() |
शाळा स्थलांत्रित करून मोक्याच्या जागेवर शासन,नगर परिषदेचा डोळा. |
अण्णा भाऊ साठे नगर परिषद शाळा क्र.4 नगर परिषदे कडून स्थालांत्रित करण्यात आली आहे. खळवाळी वस्तीचे पुंनर्वसनाचे कारण दाखून शाळा स्थालांत्रित करण्यात आली आहे. हेतू पुरस्पर शाळा स्थालांत्रित कारण्यात आल्याने या मध्ये शासन,नगर परिषदेचे शुद्ध शळयंत्र मिलिभगत दिसून येत आहे.असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी केला आहे. शाळा स्थालांत्रित करण्याचे मुख्य कारण मेन रोड असलेली मोक्याची जागा व शाळेला असलेले अण्णा भाऊ साठे यांचे नाव नगर परिषदेचा मातंग समाज द्वेष नवा नाही. सातत्याने मातंग हया दलित समाजाच्या भावना दुखाविल्या गेल्याचे अनेक उदाहरण आहेत.
लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचा न. प. ठराव होऊन दोन वर्ष झाल्या नंतर ही स्मारकाचे सौदरीकरण अजून पर्यंत करण्यात आले नाही. त्याच बरोबर किमान 35 वर्षा अगोदर पासून अस्तिवात असलेले आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा बसविण्याचा प्रस्ताव अजून प्रयत्न जिल्हअधिकाऱ्यांन कडे पाठविण्यात आलेला नाही. नगर परिषद हे सर्व द्वेष भावनेतून करीत आहे. स्थालांत्रित केलेल्या ठिकाणी सुविधानंचा मोठा अभाव आहे. अत्यंत तुटपुंज्या जागेत शाळा बांधण्यात आली आहे. भौतिक सुविधा तर नाहीच प्राथमिक स्वरूपाच्या सुविधाचा मोठा अभाव आहे लाईट, प्रसाधन गृह त्या ठिकाणी देण्यात आल्या नाहीत. प्रत्येक वर्गाचे स्वतंत्र वर्ग ही देण्यात आले नाहीत.इत्या पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग एकच वर्गात भारतात असतात मातंग समाजाचे पूजनीय असलेले लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे शाळा क्र. 4 पुनर्जीवीत करून
पूर्वीच्या जागेत शाळा सुरु करावी त्या जागेवर कॊणताही नवीन उपक्रम सुरु करू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.