नांदुरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
नांदुरा :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.स्त्री शिक्षणाच्या जननी,भारतातील प्रथम महिला शिक्षिका-मुख्याध्यापिका,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस ज्ञानेश्वरी ठाकूर हिच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची समायोजित भाषणे यावेळी झाली,त्यात सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचारांना उजाळा देण्यात आला. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना निलेश देशमुख सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, तर स्पर्धेचे परीक्षण मंगेश देशमुख सर यांनी केले.सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक वेदांत घाईट,द्वितीय क्रमांक रुचिता वसतकार, तृतीय क्रमांक यशवंत चोपडे व उत्तेजनार्थ पुरस्कार यश चव्हाण यांनी पटकाविला. कार्यक्रमाला विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.