वडिलांनीच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
मोताळा स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा वाईट उद्देशने विनयभंग करुन घटना कुणाला सांगीतली तर मारहाण करेल, अशी धमकी वडिलांनी दिल्याची घटना नांदुरा तालुक्यातील बोराखेडी पोस्टे. अंतर्गत असलेल्या एका गावात ६ जानेवारी रोजी घडली असून या प्रकरणी आरोपी पित्यावर बाल लैंगिक अत्याचार ( पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या नांदुरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी तीचे घरासमोर खाटीवर झोपलेली असतांना पिडीत मुलीच्या वडिलांनी येवून वाईट उद्देशाने तिची छाती दाबून विनयभंग केला. तसेच सदर घटना कोणाला सांगितली तर मारहाण करेल असे त्याने धमकी दिली. सदर घटना ६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी पिडीतेच्या आईने बोराखेडी पोस्टे. ला आज ९ जानेवारी रोजी फिर्याद दिली. याप्रकरणी बोराखेडी पोस्टे. ला अप.क्र. ०१३/ २०२३ भादंवीचे कलम ३५४ अ ५०७, सहकलम १२ बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय. अशोक रोकडे करीत आहेत.