स्कूल ऑफ स्कॉलर्स मलकापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मलकापूर, दि.३ जानेवारी २०२३ रोजी मलकापूर शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स, ( सी. बी. एस. सी.) मलकापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त इयत्ता ३ री च्या वर्गातील विद्यार्थीनी कु. वृंदा शर्मा या विद्यार्थिनीने आपल्या भाषणाच्या आधारे सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व कार्यासंबधी माहिती सांगितली. कु. रोमाली पाटील हिने वेशभूषा करून सावित्रीबाईंचे पात्र साकारले.
या कार्यक्रमानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुदिप्ता सरकार यांनी आपल्या मनोगाताच्या आधारे स्त्रीसशक्तीकरण ही काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ३ री च्या वर्गातील विद्यार्थीनी कु. पूर्वी लोखंडे व रुपवर्या जावरे यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. शुभ्रा पाटील हिने केले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका वैशाली चव्हाण आणि चित्रा पवार यांनी मार्गदर्शन केले. हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले .