नागपुर - सोलापुर या स्पेशल गाड़ीचा थांबा उदघाटन सोहळा सोमवारच्या रात्री थाटात संपन्न
या कार्यक्रमाचे उदघाटन प्रसन्ना देशपांडे (सदस्य राज्य आर्थिक साल्लगार समीती),अध्यक्ष शेखर धरणगावकर , प्रवासी मंडळाचे अध्यक्ष पारसमल झाबक जिल्हा प्रवासी (सेवा)संघाचे अध्यक्षॲड महेंद्रकुमार बुरड ,मोहन शर्मा आदि गाडी स्थानकावर येताच गाडीचे चालकाचा शाळ, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्वच मान्यवरांनी भुसावळ - नागपूर पॅसेंजर गाडी सुरू करण्या बद्दल आग्रह प्रशासनाकडे केला .
याप्रसंगी प्रवासी संघाचे समीर जटाळे, संतोष तलरेजा,आर आर चव्हाण ,धीरज मुंधडा, चंद्रकांत वर्मा ,राजेंद्र कोचर ,ॲड विनोद संचेती ,जितेंद्र लोढाया ,विकास रायपुरे तर मिलिंद डवले ,डॉ दंड ,डॉ विवेक डागा, डॉ योगेश पटणी ,संतोष बोबटकार, रिषभ झाबक ,वीरेंद्र भंसाली, मयूर आचलिया ,अशोक शर्मा ,कालू चव्हाण, किशोर बाहेती, विमल संचेती, मनीष लखानी, मनोज भीमजीयांनी, डॉ अशोक नाहार, स्टेशन प्रबंधक ठाकूर आदि हजर होते. प्रस्ताविक व आभार प्रदर्शन ॲड महेंद्रकुमार बुरड यांनी केले.